Ration Card Yojana: नमस्कार मित्रांनो, राज्यभरात केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नवनवीन योजना आणत आहे. आणि त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊन गरीब कुटुंब आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत. त्याचबरोबर आता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना सरकारकडून एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ हा एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना दिला जाणार आहे.
मुलीचा जन्मदर वाढवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर मुलींना शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एक ऑगस्ट 2017 रोजी माजी कन्या भाग्यश्री या नावाने सुरू करण्यात आली होती. आणि त्यानंतर ही योजना अधिक्रमित करून गरीब मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना म्हणून संबोधित केली.
म्हणजेच माझी कन्या भाग्यश्री हे या योजनेचे नाव बदलून लेक लाडकी योजना असे नाव ठेवण्यात आले. हे नाव राज्य सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात जाहीर केले होते. त्यानुसार राज्यातून लाखोच्या संख्येने या योजनेला प्रतिसाद मिळाला.Ration Card Yojana
आपण जर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात उल्लेख लाडके योजनेला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून या जिल्ह्यात तब्बल 1691 लाभार्थी मुलींची या योजनेसाठी नोंद करण्यात आली होती. त्याचबरोबर यापैकी 701 मुलींनी आपले अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे सादर केले आहेत. आणि आता या मुलींची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे.
आणि या लेक लाडकी योजनेचा लाभ हा पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक गरीब कुटुंबातील मुलींना दिला जात आहे. लाभार्थी मुलीच्या खात्यात या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्यांमध्ये अनुदान स देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो मुलीच्या जन्मानंतर लाभार्थी कुटुंबांना 5 हजार रुपये दिले जातात. त्यानंतर इयत्ता पहिली नाव टाकल्यानंतर लाभार्थी कुटुंबांना सहा हजार रुपये दिले जातात.
मुलगी सहावी वर्गात गेल्यानंतर तिला सात हजार रुपये दिले जातात. त्यानंतर अकरावी वर्गात गेल्यानंतर आठ हजार रुपये दिले जातात. आणि त्यानंतर शेवटचा हप्ता हा 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी 75 हजार रुपये रोख रक्कम दिली जाते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की पिवळ्या व केसरी कुटुंबातील गरीब मुलींना या योजनेअंतर्गत तब्बल एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते…Ration Card Yojana