Bank Rules 2024: नमस्कार मित्रांनो, बँक खाते हे जीवनातील खूपच महत्त्वाची गरज बनलेली आहे. आता कोणताही व्यवहार करायचा म्हटल्यावर आपल्याला पैसे बँकेमधून काढावी लागतात किंवा फोन पे गुगल पे तसेच इत्यादी साधनांमधून आपण पैसे लोकांना पाठवतो. परंतु यासाठी आपल्याला सुरुवातीला बँक खाते खोलणे खूप गरजेचे असते. आणि अनेक जण सर्वच बँकांमध्ये खाते उघडत आहे. आणि यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात त्रास होतो.
चला तर मग मित्रांनो आपण या बातमीमध्ये पाहूया की आरबीआयच्या नियमानुसार एखादा व्यक्ती किती बँक खाते उघडू शकतो. आपण जर थोडा जास्त विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांची बँक खाते आहेत. परंतु आता बँकांप्रमाणे प्रायव्हेट बँका देखील उपलब्ध झालेल्या आहेत.
आणि या प्रायव्हेट बँकेमध्ये देखील अनेक जण खाते उघडत आहे आणि पैशाची देवाणघेवाण करत आहे. त्याचबरोबर या प्रायव्हेट बँकांमध्ये पी एफ डी वर तसेच आपण ठेवलेल्या पैशांवर जास्त प्रमाणात व्याजदर मिळते. यामुळे देखील शासकीय बँकांपेक्षा जास्त प्रायव्हेट बँकांना सध्या मान मिळत आहेत.
परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रायव्हेट बँका बुडाल्याचे देखील अनेक घटना समोर आले आहेत. त्याचबरोबर अनेकांचे पैसे देखील त्या बँकांमध्ये गुंतलेले असतात. परंतु अनेक वेळा त्यांना ते पैसे वापस दिले जातात. परंतु अनेक जणांची रक्कम जास्त प्रमाणात मोठी असते यामुळे त्यांना पैसे वापस देण्यास वेळ लागतो. यामुळे त्या नागरिकाची तारांबळ उडते.Bank Rules 2024
चला तर मग बँक खाते कशाप्रकारचे असतात याबद्दल माहिती पाहूया..
बँक खात्याची तीन प्रकार असतात..
एक बचत खाते
दोन चालू खाते
तीन संयुक्त खाते
वरीलपैकी तुम्ही कोणतेही खाते उघडू शकता. त्याचबरोबर तुमचे वय वर्ष कमी असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांसोबत किंवा नातेवाईकांसोबत संयुक्त खाते उघडू शकता. त्याचबरोबर तुमचे वय वर्ष अठरा वर्षाच्या पुढे गेले तर तुम्ही तुमचे स्वतःचे खाते उघडू शकता.
आरबीआयच्या नियमानुसार भारतातील व्यक्ती कितीही बँक खाते उघडू शकतो. ही केवळ अफवा आहे की बँकांमध्ये एवढेच खाते उघडले पाहिजे अन्यथा कारवाई होईल. अशी कोणतीही माहिती आरबीआय ने दिलेली नाही. यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेत खाते उघडू शकता. परंतु प्रायव्हेट बँकेमध्ये गुंतवणूक करण्या अगोदर त्या बँकेबद्दल माहिती नक्की घ्या. त्याचबरोबर अनेक वेळा आपल्या बँक खात्यामध्ये पैसे कमी असल्यामुळे त्याचबरोबर आपण कोणताही व्यवहार केला नसल्यामुळे अनेक वेळा आपली बँक खाते बंद पडते…Bank Rules 2024