Zilla Parishad Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी सरकारकडून दरवेळेस नवनवीन योजना सुरू केल्या जातात. तसेच सरकार बदलल्यानंतर अनेक योजना बंद पडतात. आणि तसेच नवीन सरकार आल्यानंतर योजना देखील अमलात आल्या जातात. तसेच मित्रांनो आता सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिंदे सरकारकडून नवीन योजना राबवली जात आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जिल्हा परिषद मार्फत अर्ज करता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
शिंदे सरकारकडून विविध ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर, कडबा कुट्टी मोटार पंप, फवारणी यंत्र, डिझेल इंजिन आणि ताडपत्री वाटप केली जात आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेऊन अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थिती सुधारत आहेत.Zilla Parishad Scheme
सध्या ही योजना सातारा जिल्हा परिषद मार्फत राबवले जात आहे. तसेच मित्रांनो जिल्हा परिषद स्वयंनिधीतील वैयक्तिक लाभाच्या योजना 202425 साठी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच हे अर्ज शेतकऱ्यांनी आपापल्या पंचायत समितीकडे सादर करावे अशी देखील सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण याप्रमाणे अर्जाचा नमुना दिलेला आहे. हा नमुना तुम्ही सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे?
- शेतीचा 8 अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- छोटे कुटुंब असलेले प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
- रेशन कार्ड
- पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा पशुधन उपलब्धतेचे प्रमाणपत्र
- सिंचन सुविधा असल्याचा पुरावा
- तसेच ठिकाणी इत्यादी कागदपत्रे देखील लागू शकतात.Zilla Parishad Scheme