Ahilya Sheli Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाची माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांना सरकारकडून 90 टक्के अनुदानावर दहा शेळ्या आणि एक बोकड दिले जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी लगेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या योजनेचे नाव हे अहिल्या शेळी योजना 2024 ठेवण्यात आले आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…
अहिल्या शेळी योजना 2024 पात्रता काय आहे?
अहिल्या शेळी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तसेच मित्रांनो या योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्यांचे वय हे 18 वर्षे पूर्ण असावे. त्याचबरोबर जर शेतकऱ्याकडे आधार कार्ड, महाराष्ट्रातील असल्याचा रहिवासी पुरावा आणि त्याचबरोबर तुमच्याकडे असलेल्या जमिनी संदर्भात संपूर्ण कागदपत्रे लागतील. तसेच बँक खाते क्रमांक आणि तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक असणार आहे.Ahilya Sheli Yojana
या योजनेसाठी तुम्ही तुमच्या जवळील ग्राहक सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करू शकता. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार असून यामध्ये शेतकरी दूध तसेच मास विक्री करू शकतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी तुमच्या भागात वापरल्या जाणाऱ्या शेळ्यांच्या जातींची निवड करावी जेणेकरून तुम्हाला शेळीचे आरोग्य तसेच संगोपन करणे सोपे जाईल. शेळीला व्यवस्थित गवत चारा धान्य खनिज पदार्थ प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस यासारखे पदार्थ द्यावेत.
अहिल्या शेळी योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला सुरुवातीला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी विचारलेल्या प्रश्नांची माहिती तुम्हाला भरावी लागेल आणि सर्वात शेवटी तुम्हाला मागितलेली सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी अपलोड करावी लागतील. अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत देखील खूपच सोपी आहे. परंतु मोबाईलवरून अनेकांना कागदपत्रे अपलोड करता येत नाहीत यामुळे तुम्ही सीएससी सेंटरला भेट देऊन या योजनेचा अर्ज करावा.Ahilya Sheli Yojana