Swachhalaya Subsidy Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत महत्त्वपूर्ण आणि तुमचा फायद्याच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ती योजना म्हणजेच प्रधानमंत्री ग्रामीण शौचालय योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी तब्बल 12 हजार रुपये अनुदान दिले जात आहे.
चला तर मग या योजनेचा अर्ज कोठे आणि कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया, मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण भागातील राहणाऱ्या म्हणजेच खेडेगावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेचा मुख्य हेतु म्हणजे हागणदारी मुक्त गाव बनावे. यामुळे मोदी सरकारने ही योजना राबवली आहे.
स्वच्छ भारत अभियान ही योजना केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना बारा हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा शासन निर्णय 7 नोव्हेंबर 2014 साली घेण्यात आला आहे. या योजनेचे अनुदान हे 75 टक्के केंद्र देणार आहे. त्याचबरोबर 25% हिस्सा राज्य सरकार अनुदान म्हणून देणार आहे.
या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? खालील प्रमाणे संपूर्ण माहिती…
- मित्रांनो, या योजनेचा लाभ हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना दिला जाणार आहे
- ज्या घरामध्ये महिला प्रमुख आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल
- सर्वत् दारिद्र्य रेषेखालील कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील
- शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल
- लहान व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.Swachhalaya Subsidy Scheme
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- बँक पासबुक
- पत्ता
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- इतर वैयक्तिक माहिती
वरील संपूर्ण माहिती ही ज्या नागरिकाला अर्ज करायचा आहे त्याची असायला पाहिजे.
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र नागरिकांनी ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज करावा. तुम्हाला जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड अशी इत्यादी कागदपत्रांची प्रत घेऊन संबंधित कार्यालयात म्हणजेच तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जा. त्यानंतर तिथे तुम्ही अर्ज करू शकता.
किंवा
तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही सरकारच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा वेळ लागेल. त्यानंतर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची व कागदपत्रांची अचूक माहिती लिहा. त्यानंतर तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपये मिळू शकतात.Swachhalaya Subsidy Scheme
अर्ज करण्याची लिंक पुढीलप्रमाणे :- https://swachhbharatmission.gov.in/sbmcms/index.htm