Free education: नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी अशी महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत जे की मुलींसाठी खूपच उपयुक्त आहे या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला मुलींच्या शिक्षणाबद्दल महत्वपूर्ण अपडेट्स देणार आहोत चला तर मग पाहूया या बातमीमध्ये नक्की मुलींच्या शिक्षणाबद्दल कोणते नवीन अपडेट्स आहेत.
महाराष्ट्रातील सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र मध्ये जे गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल व सामाजिक असे मागासवर्गीय कुटुंबीयांमधील मुलींसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी योजना राबवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबांमध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नसते त्या कुटुंबामधील मुले उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात. त्यांना पुढचे शिक्षण घेणे कठीण जाते. कारण उच्च शिक्षणासाठी त्यांना पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे त्या शिक्षण घेत नाहीत.
महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण घेण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुलींसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. या योजनेमध्ये जे आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच ईडब्ल्यूएस, एस सी बी सी, ओबीसी या प्रवर्गातील मुली आहेत त्यांना शैक्षणिक शिक्का आणि परीक्षा शुल्काचे 100 टक्के फी दिली जाणार आहे. परंतु, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मित्रांनो या योजनेचा अर्ज कसा करायचा हे आपण पाहूया त्याचबरोबर योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील तेही पाहूया.
पालकांचे 8 लाख रुपये पेक्षा कमी असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
हे प्रमाणपत्र दरवर्षी देण्याची गरज नाही प्रवेश करताना एकदाच द्यावे लागेल.
शैक्षणिक वर्ष 2024 पासूनच विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे.
परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच ॲडमिशन केले आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. Free education
योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा