Prostahan Anudan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारकडून सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि ही बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मोठी भेट देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा म्हणजेच पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान होय. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी 2017-18 तसेच सण 2018-19 आणि सण 2019-20 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते आणि त्या कर्जाचे परतफेड नियमित केले होते त्या शेतकऱ्यांना पुरस्थान अनुदान दिले जाणार आहे.
सरकारच्या अधिकृत शासन निर्णयानुसार, वरी दिलेल्या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा संपूर्ण शासन निर्णय तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.
या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही…
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- जे शेतकरी महाराष्ट्रातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य असलेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- त्याचबरोबर या योजनेची अधिकृत माहिती तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता…Prostahan Anudan Yojana