Goverment News: महाराष्ट्रातील होमगार्ड कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा केली आहे. होमगार्डच्या मानधनात जवळजवळ दुप्पट वाढ करण्यात आली असून आता प्रतिदिन ₹570 ऐवजी ₹1083 इतके मानधन मिळणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील होमगार्डला देशातील सर्वाधिक मानधन मिळणार आहे.
होमगार्ड मानधन बदल – महाराष्ट्र
कालावधी | पूर्वीचे मानधन (प्रतिदिन) | आताचे मानधन (प्रतिदिन) |
---|---|---|
पूर्वी (2023 पर्यंत) | ₹300 – ₹570 | – |
आता (1 ऑक्टोबर 2024 पासून) | – | ₹1,083 |
- उपहार भत्ता: ₹100 वरून ₹200
- भोजन भत्ता: ₹100 वरून ₹250
हा बदल राज्य सरकारने महागाई आणि होमगार्डच्या योगदानाचा विचार करून केला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील होमगार्डना देशात सर्वाधिक मानधन मिळेल.
महाराष्ट्रात होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. 2024 च्या भरतीद्वारे सुमारे 9,700 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर माजी सैनिक व CAPF कर्मचाऱ्यांसाठी 10 वी पात्रता मान्य आहे. वयोमर्यादा 20 ते 50 वर्षे ठेवण्यात आली असून, उमेदवारांना शारीरिक मापदंडांनुसार उंची आणि छातीची मापे दिलेली आहेत.Goverment News
भरतीची प्रमुख वैशिष्ट्ये:
- शैक्षणिक पात्रता: किमान 10 वी उत्तीर्ण.
- वयोमर्यादा: 20-50 वर्षे.
- अर्ज पद्धत: ऑनलाइन अर्ज आवश्यक.
- भरतीची तारीख: अर्ज प्रक्रिया 25 जुलै 2024 पासून सुरू होऊन 10 ऑगस्ट 2024 पर्यंत होती.
- भरती होणारे जिल्हे: राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे.
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये फोटो ओळखपत्र, शिधापत्रिका, किंवा वाहन परवाना यांचा समावेश आहे. तसेच निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्याचबरोबर मित्रांनो सध्या होमगार्ड पदाच्या भरती साठी अर्ज प्रक्रिया सुरूवान आहे. यामुळे नवीन भरती उपलब्ध झाल्यानंतर आम्ही आमच्या व्हाट्सअप तुम्हाला लगेच सूचना देत जाऊ. यामुळे तुम्ही आताच आमचा व्हाट्सअप ग्रुप खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा.Goverment News