Solar Pump Scheme: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी कुसुम सोलर पंप योजनेला सुरुवात झाली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सरकारच्या अनुदानावर सोलार पंप बसवले आहे. त्याचबरोबर अजून देखील ज्या शेतकऱ्यांना सोलार पंप सरकारकडून अनुदानावर घ्यायचे आहे त्यांच्यासाठी अर्ज करण्याची संधी आहे. सध्या महावितरण कडून शेतकऱ्यांना सोलार पंप देण्यात येणार आहेत. यामुळे तुम्ही या योजनेसाठी नक्कीच अर्ज करू शकता. या योजनेचा अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे.
त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील अगदी सोप्या पद्धतीने ठेवली आहे. त्यामुळे शेतकरी सहज आपल्या मोबाईलवरून देखील महावितरणाकडे आपला अर्ज सादर करू शकतात. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
महाराष्ट्र शासनाच्या कुसुम सोलार पंप योजनेसारखीच योजना महावितरणाकडून शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे आणि तसेच महावितरण कडून या योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ विशिष्ट शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. अर्जासाठी खालील अटी आहेत.
सध्या कुसुम सोलार पंप योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की कुसुम सोलर योजनेची साईट तर बंद आहे. मग शेतकऱ्यांना नेमकं अर्ज कोठे करावा लागेल. तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी महावितरणाकडे नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी अर्ज केलेला होता. आणि अशा शेतकऱ्यांना अद्याप वीज कनेक्शन मिळाले नाही. असे सर्व शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन पाहिजे होते आणि त्यांनी महावितरणाकडे वीज कनेक्शन साठी अर्ज केला होता असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.Solar Pump Scheme
त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेसाठी यापूर्वी अर्ज केला आहे. त्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. कारण ज्यावेळेस आपण महावितरणाच्या या नवीन पोर्टलवर अर्ज करू त्यावेळेस आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही कुसुम सोलार पंप साठी अर्ज केला आहे असे दाखवेल. यामुळे या योजनेत तुम्ही अपात्र ठरला.
महावितरणाच्या या योजनेचा अर्ज कोठे करावा संपूर्ण माहिती?
महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम खालील दिलेल्या लिंक वर क्लिक
https://kusumbenef.mahadiscom.in/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
करून `पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का’ या ठिकाणी Yes पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर त्या ठिकाणी सविस्तर माहिती दाखवली जाईल.
आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमची सविस्तर माहिती भरून अर्ज सबमिट करा.
त्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड त्या ठिकाणी मोबाईलवर मिळेल.
मग मित्रांनो युजर आयडी आणि पासवर्ड भेटल्यानंतर कुसुम सोलार पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरून कागदपत्र अपलोड करावे.
त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करावा. त्यानंतर त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी
नोंदणी केल्यानंतर लॉगिन करण्यासाठी खालील लिंक वर जावे
https://kusumbenef.mahadiscom.in/benef_home Solar Pump Scheme