SBI Bank Account: भारतामध्ये सर्वात मोठी बँक म्हणजे SBI बँक होय ही बँक सार्वजनिक असल्यामुळे या बँक मध्ये भारतातील अनेक नागरिकांचे खाते आहे. SBI बँक ची नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. ग्राहकांसाठी नवीन नवीन बदल घडून आणते. एसबीआय ने आत्ताच आहे महत्त्वपूर्ण बदल घडून आणले आहेत. या नवनवीन बदलांमुळे ग्राहकांना बँकिंगचे व्यवहार करणे खूपच सोयस्कर होत आहे. सुरुवातीला बँक मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँक मध्ये लाईन लावावी लागत होती. परंतु आता बँकच्या बदलामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या अकाउंट चे पैसे काढू शकतात. किंवा ट्रान्सफर करू शकता, अनेक बँकिंग व्यवहार देखील तुम्ही घरबसल्यास करू शकतात.
बँकने केलेल्या बदलांमुळे तरुण पिढीला खूपच लाभ मिळत आहे. SBI ने करोडो तरुणांसाठी नवीन अपडेट लागू केले आहेत. त्यामुळे तरुण पिढी खूपच आनंदी आणि समाधानकारक झाली आहे. SBI ऑनलाइन बँकिंग सेवा ही ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत उपलब्ध आहे त्यामुळे या बँक मध्ये सर्वाधिक खाते हे तरुणांनी उघडलेले आहे. या नवीन अपडेट मुळे तरुणांना त्यांचे काम अगदी जलद गतीने होणार आहे.
तरुणांबरोबरच वृद्ध ग्राहकांसाठीही हे बदल खूपच फायदेशीर ठरले आहे कारण वयोवृद्ध खातेदारांचे बोटांचे ठसे बहुतेकदा गळून पडतात आणि त्यांचे फिंगरप्रिंट काम करत नाहीत. त्यामुळे ते त्यांचे व्यवहार करू शकत नाहीत. परंतु या बदलामुळे या समस्यावर मात करण्यासाठी एसबीआय ने आपल्या प्रणालीत बदल केला आहे. वयोवृद्ध खातेदारांना त्यांचे व्यवहार सहजपणे आता करणे शक्य होणार आहे.
घरबसल्या बँक स्टेटमेंट
एसबीआय ने आता ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे यामध्ये ग्राहकांना बँक स्टेटमेंट साठी बँकेत जाण्याचे गरज नाही ग्राहकांना आता घरबसल्या त्यांच्या मोबाईलवरून बँक स्टेटमेंट मिळवता येते.
बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठी एसबीआय ने टोल फ्री नंबर जारी केला आहे.
1. 1800 1234
2. 1800 2100
या नंबर वर कॉल करून ग्राहक स्टेटमेंट मिळू शकतो. ते स्टेटमेंट खालील प्रमाणे
1. कॉल केल्यानंतर खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 1 दाबा
2. बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक टाका.
3. खात्याच्या माहितीसाठी दोन दाबा.
4. बँक स्टेटमेंट चा कालावधी निवडा
5. निवडलेल्या कालावधीचे स्टेटमेंट तुमच्या नोंदी कृत ईमेल पत्त्यावर पाठवले जाईल.SBI Bank Account