Karj Mafi Yojana: या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार..!! लगेच पहा राज्य सरकारची नवीन योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Karj Mafi Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या बातमीत राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने कोणता निर्णय घेतला आहे? आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची खरच कर्जमाफी होणार आहे का? किती रुपयांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते? याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत…

 

शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यांमध्ये कर्जमाफीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी का नाही याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर आत्ताच तेलंगणा सरकारने 31 हजार कोटीचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. आणि तेलंगणा सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी व्हावी अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्याचबरोबर किसान सभेचे नेते अजित नवले, उद्धव ठाकरे, संजय जाधव आणि नाना पाटोले यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी सरकारपुढे मागणी केली आहे. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे.

आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 च्या अधिवेशनामध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणाची अंमलबजावणी अजून पर्यंत केलेले नाही. त्याचबरोबर या घोषणेची नंतर चर्चा देखील राज्य सरकारने केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यामुळे किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली असून या मागणीमध्ये ते असे म्हणाले आहेत की, शेतकऱ्यांना केवळ कागदी कर्जमाफी देऊ नका शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्वरित लाभ मिळावा अशी तरतूद करा. अशी मागणी किसान सभेच्या नेत्यांनी केली आहे.

त्याचबरोबर मित्रांनो आता आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीमुळे सरकार देखील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. यामुळे या घोषणांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा देखील येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.Karj Mafi Yojana

Leave a Comment