PM Kisan Samman Nidhi Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केली होती. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत देशभरातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यात सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. करांच्या ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते. त्याचबरोबर या योजनेत सातत्याने नवनवीन बदल करण्यात आले असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 18 हप्ते दिले आहेत.
त्याचबरोबर आता सरकारकडून ऑगस्ट महिन्यातील लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव असेल त्या शेतकऱ्याला पुढील 19 वा हप्ता दिला जाणार आहे. यामुळे तुम्ही देखील या लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही हे चेक करू शकता. चला तर मग जाणून घेऊया पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत नाव कसे पाहायचे…
पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी असे पहा नाव,…
- शेतकऱ्यांना सर्वप्रथम पुढे दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
- https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx
- त्यानंतर तुम्ही सरकारच्या अधिकृत पोर्टलच्या मुख्यपृष्ठावरील लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर त्या ठिकाणी तुमचे राज्य त्यानंतर तुमचा जिल्हा
- त्यानंतर उपजिल्हा म्हणजेच तालुका त्यानंतर तुमचे गाव निवडा
- वरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही गेट रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्या गावाची लाभार्थी यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल…PM Kisan Samman Nidhi Yojana